Lakhpati didi yojana Apply : लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
कोणती कागदपत्र लागणार ?
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडं आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पासबूक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.
महिला कशा होणार लखपती ?
लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
अर्ज कसा करणार?
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना ‘स्वयं मदत गट’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडं पाठवण्यात येईल. या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल. सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील.
एकूण 3 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे.