जमिनीचा नकाशा कसा पाहायचा?

  1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या अधिकृत वेब साईट वरती जायच आहे.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  3. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
  4. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
  5. इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
  6. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
  7. आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  8. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

 

👉 येथे क्लिक करून वेबसाईटवर जा व नकाशा डाऊनलोड करा 👈