पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यावेळची दिवाळी आनंदाची असणार आहे. दिवाळी सणानिमित्त त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए वाढ) वाढवून दिवाळीची भेट देऊ शकते. याआधी दसऱ्यापर्यंत याची घोषणा होणे अपेक्षित होते, पण मिळालेल्या माहितीनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत मोठी भेट देऊ शकते. यावेळी डीए चार टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.

महागाई भत्ता 46 टक्क्यांनी वाढणार
नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Govt) केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी (4% DA Hike) वाढवला तर तो सध्याच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के होईल. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतेही वक्तव्य किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे की या दिवाळीत सरकार डीए मध्ये वाढ जाहीर करण्याची शक्यता आहे.