लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत सिलेंडर लाभार्थी यादीत नाव पहा

ladaki bahin aditi tatkare lpg cylinder yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२ पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. सरकारने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे ) एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येईल.

अन्नपूर्णा योजनेस पात्र कोण?

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.
  • सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असेल.
  • एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठ पात्र असेल.
  • १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे. गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येतं. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३ मोफत सिलिंगडरचंही वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यायची ५३० प्रति सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ladaki bahin aditi tatkare lpg cylinder yojana.

Leave a Comment